
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ! 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron variant) संकट गडद होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला संबोधित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षांतील मुलांसाठी लसीकरण (Vaccination) सुरु करणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच कोरोना अजूनही गेलेला नसल्याने काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस (Booster dose) दिला जाणार आहे. 10 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. तसेच 60 वर्षावरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, परंतु यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत कोरोनाविरुद्धच्या (Corona) लढाईत चांगली कामगिरी करीत आहे. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे. भारताची आर्थिक स्थितीही उत्साहजनक असल्याचे मोदी यांनी सांगितले.
ओमिक्रॉन बाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ओमिक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही. केवळ सतर्क रहा आणि कोविड नियमांचे पालन करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. तसेच सध्या सरु असलेल्या नाताळ आणि वर्षाअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Government is going to start #vaccination for adolescents between the age of 15 to 18 years from 3 January 2021: PM @narendramodi pic.twitter.com/0LJnhQm7Ij
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 25, 2021
Web Title :- PM Narendra Modi | pm narendra modi announces vaccines children up to 15 years from monday
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BHR Scam | बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला अटक
Crime News | मिरवणुकीच्या काही तास आधी नवरदेवाने केली आत्महत्या, ‘या’ गोष्टीचा होता राग