PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौर्‍यावर येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Narendra Modi | पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) डिसेंबर अखेर पुण्यात येत आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे (hinjewadi to shivajinagar metro) भूमिपूजन होणार आहे. या अनुषंगाने प्रशासकीय तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pune, Pimpri-Chinchwad Municipal Corporation) प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडे तयार झाले आहेत. या दोन्ही महापालिकांसह पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही येत्या जानेवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा पुणे दौरा होतोय. पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर, पंतप्रधानांच्या दौऱ्यातच महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा भाजपाचा (BJP) प्रयत्न आहे. परंतु, या माहितीस दुजोरा मिळू शकला नाही. ओबीसी आरक्षणास (obc reservation maharashtra) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिल्याने याबाबत स्पष्टता नसल्याचे म्हटले जातं आहे. दरम्यान, हिंजवडी मेट्रोसाठी (Hinjewadi Metro) केंद्राने बाराशे कोटी रुपये दिलेत. या मेट्रोचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते या डिसेंबर अखेर होऊ शकते. या 2 कार्यक्रमांशिवाय स्वतंत्र कार्यकर्ता मेळावा घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारात पंतप्रधानांना गुंतवू नये, अशी देखील चर्चा सुरु आहे.

 

Web Title :- PM Narendra Modi | pm narendra modi likely visit pune in end december

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | मनाविरूध्द पत्नी PhD करते म्हणून छळ, पतीविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 6 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?

Army Helicopter Crash | सीडीएस बिपीन रावत यांना घेवुन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पत्नी ‘मधुलिका’ यांच्यासह 9 जण करत होते प्रवास; 4 जणांचे मृतदेह आढळले (व्हिडीओ)