PM Narendra Modi | अमेरिकेहून मायदेशी परतताच PM नरेंद्र मोदी करणार ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल (बुधवारी) अमेरिका दौ-यावर रवाना झाले आहेत. मात्र पंतप्रधान मोदी हे अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर एका मोठ्या योजनेची सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मोदी (PM Narendra Modi) भारतात परतताच एक मोठी घोषणा करणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला एक युनिक हेल्थ आयडी (Unique Health ID) मिळणार आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Health Minister Mansukh Mandavia) यांनी दिलीय.

आरोग्य क्षेत्रातील (Health sector) नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्या लोकांना आरोग्य अभियानाशी जोडण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकार राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान (PM Digital Health Mission) प्रारंभ करीत आहे. यानुसार यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचे रेकॉर्ड असणार आहे.

या आरोग्य कार्डाचा जो आयडी असेल तो आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या सहाय्याने तयार केला जाणार आहे. PH-DHM चा प्रमुख उद्देश हा देशाची आरोग्य सेवा प्रणाली आणखी चांगली बनविणे हा असणार आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन (PM Digital Health Mission) हे सध्या पायलट प्रोजेक्टवर चालविले जात आहे.
NDHM च्या वेबसाईटवर गेल्यास तुम्हाला हेल्थ आयडी बनविण्याचा पर्याय असेल.
तसेच, हेल्थकेअरच्या गरजांना वन स्टॉप सोल्यूशन बनविण्याची तयारी आहे.
यामुळे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून त्यांना यावर उत्तर द्यावे लागणार आहे.

हे देखील वाचा

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येणार पैसे?

OBC Reservation | OBC चा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर सुधारीत अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Narendra Modi | pm narendra modi will make big announcement september 27 you will get unique health id

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update