100 महिलांनी पाण्यासाठी 18 महिन्यांत ‘फोडला’ 107 मीटर उंच डोंगर, पंतप्रधांनी केले ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी ‘मन कि बात’ या आपल्या मासिक कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी जलसंधारणाबद्दल बोलत असताना मध्य प्रदेशातील बुंदेलखंड येथे राहणारी बबीता राजपूतचे कौतुक केले. यानंतर बबिता राजपूतने देखील पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

100 महिलांनी मिळून तलावाला कालव्याशी जोडले
मध्य प्रदेशातील छतरपूर येतील भेल्दा गावच्या महिलांनी डोंगर फोडून कालव्याला तलावाशी जोडले. यात त्यांची प्रेरणा बनली 19 वर्षाची बबिता राजपूत. जिचे कौतुक खुद्द पंतप्रधानांनी केले आहे. जवळपास 100 महिलांनी जल संवर्धन क्षेत्रात परमार्थ समाज सेवी संस्थेच्या मदतीने 107 मीटर लांब डोंगर फोडून एक असा रस्ता तयार केला, ज्यामुळे त्यांच्या गावाच्या तलावात पाण्याचा साठा होऊ लागला आहे.

18 महिन्यांत फोडला 107 मीटर उंच डोंगर
पूर्वी पावसाचे पाणी डोंगरातून वाहून जात असे. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी बुंदेलखंड पॅकेजअंतर्गत 40 एकरमध्ये बनलेल्या तलावात पावसाचे पाणी पोहोचू शकत नव्हते आणि तलाव रिकामा होता. यानंतर बबीता राजपूत यांनी गावातील महिलांना प्रेरणा दिली आणि वनविभागाशी चर्चा केल्यानंतर 107 मीटरचा डोंगर फोडण्यात आला. आता हा तलाव पाण्याने भरला असून कोरड्या विहिरीतही पाणी आले आहे. याखेरीज सुकलेले हातपंप देखील पाण्याने भरले आहेत. श्रमदान करून 100 पेक्षा जास्त महिलांनी आपल्या गावाच्या चांगल्या प्रगतीसाठी परिश्रम घेतले आणि 18 महिन्यानंतर त्यांच्या गावात आनंदाचे वातावरण आहे.

पंतप्रधान मोदींनी केले बबिता राजपूचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात म्हंटले कि, बबीता राजपूतचे गाव बुंदेलखंडमध्ये आहे. तिच्या गावाजवळ एक खूप मोठा तलाव होता, तो कोरडा झाला होता. तिने गावातील इतर महिलांना सोबत घेऊन तलावापर्यंत पाणी जाण्यासाठी कालवा बनविला. या कालव्याद्वारे पावसाचे पाणी थेट तलावात जाऊ लागले आणि आता हा तलाव पाण्याने भरला आहे. अगरौठा गावाची बबीता जे करत आहे हे आपणा सर्वांना प्रेरणा देईल. पंतप्रधान म्हणाले की, जलसंधारण ही केवळ सरकारची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे व देशातील नागरिकांनी हे समजून घेतले पाहिजे.