…म्हणून पंतप्रधान मोदींनी केली केरळची प्रशंसा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विविध राज्यांत रुग्णवाढीचा वेगही मोठा आहे. पण केरळ राज्यातील कोरोना परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. कोरोनासारख्या या महामारीच्या काळात लसींची नासाडी रोखणे महत्वाचे पाऊस असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्विट करून राज्यातील लसीकरणाविषयी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘राज्याला केंद्र सरकारकडून 73,38,806 लसींची मात्रा मिळाली. अतिरिक्त मात्राचा वापर करत असताना 74,26,164 डोस आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पी. विजयन यांनी राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि विशेषत: नर्सचे कौतुक केले’.

विजयन यांच्या ट्विटनंतर पंतप्रधान मोदींनीही ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की ‘लसींची नासाडी टाळून आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि नर्सेनी एक उदाहारण आपल्यासमोर ठेवले आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत लसींची नासाडी कमी करणे आवश्यक आहे. तसेच कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लसींची नासाडी रोखणे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.