PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार, घेणार दगडूशेठचे दर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ (Lokmanya Tilak National Award) प्रदान केला जातो. यावर्षी हा पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी पंतप्रधान येत्या 1 ऑगस्ट रोजी पुण्यात (PM Modi In Pune) येण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे (Dagdusheth Halwai Ganapati) दर्शन घेणार आहेत. पंतप्रधानांना हा पुरस्कार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी पुण्यामध्ये 1 ऑगस्टला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुण्यात येत असल्याने पुणे पोलीस, पालिका व यंत्रणा कामाला लागली आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला (Lokmanya Tilak Award To PM Modi) आहे. मोदींनी त्याचा मनःपूर्वक स्वीकार देखील केला आहे. या पुरस्काराचे वितरण 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार असून तो स्वीकारण्यासाठी मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तसेच जिल्हा प्रशासन (District Administration), महापालिका (Pune PMC) आणि पोलिस दलाकडून या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप पुरस्कार वितरणाचा तपशील किंवा पंतप्रधानांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुमारे तीन ते चार तास शहरामध्ये असणार आहेत.
ते पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती लावणार असून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
त्याचप्रमाणे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्ग आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. पंतप्रधनांच्या या पुणे दौऱ्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून पुणे भाजपामध्येही (BJP Pune) उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडली. यावेळी नेमके कोणकोणते कार्यक्रम घेता येतील, याचा आढवा घेण्यात आला. या बैठकांमधून मोदी यांच्या सुमारे तीन ते चार तासांच्या पुणे दौऱ्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच विभागीय आयुक्त,
जिल्हाधिकारी (Rajesh Deshmukh), पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापालिका (PCMC) तसेच पोलिस आयुक्त
(Ritesh Kumar) यांनी नुकतीच लोहगाव विमानतळ तसेच मोदी यांच्या शहरातील संभाव्य प्रवासमार्गाची पाहणी केली.
पंतप्रधान कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी पुण्यात येऊन प्रत्यक्ष जागांची, व्यवस्थेची पाहणी करतील.
त्यानंतरच अंतिम दौरा जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बोलणे तोडल्याने तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसरमधील घटना