मी अत्यंत जवळचा मित्र गमवला, PM नरेंद्र मोदी ‘भावनिक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं आज निधन झालं. त्यानंतर देशातील राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मोदी यांनी ट्विटरवर म्हंटले आहे की, ‘जेटली हे पक्षाचे लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे कार्यक्रम व विचारसरणी समाजापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांपासून त्यांना प्रेम मिळाले. जेटलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भारतीय राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे आणि प्रशासन याविषयीचे त्यांचे ज्ञान असामान्य होते. जेटलींची कमतरता सदैव जाणवत राहील.’

जेटली हे गेल्या दोन वर्षांपासून आजारी होते. त्यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती. त्यावर उपचार करण्यासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. त्याआधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारासाठी न्यूयॉर्कला जावं लागल्याने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिलं होतं.

आरोग्यविषयक वृत्त –