ही तर सुरुवात आहे, पुढे बघा काय काय होतं : नरेंद्र मोदी

मसूद अझहरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

जयपूर : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. भारताच्या कूटनितीचा हा विजय असल्याची प्रतिक्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हे मोदीचे यश नाही तर संपूर्ण देशाचे यश आहे. मात्र ही केवळ सुरूवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होते. असे म्हणत त्यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

हा नवीन भारत आहे. आणि हा नवीन भारताचा आवाज आहे. भारताने केलेल्या पाचव्या प्रयत्नाला चीनला हार मानावी लागली. अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केले. मागील दहा वर्षापासून भारत यासाठी प्रयत्न करत होता, या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. चिनने प्रत्येकवेळी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंतरराष्ट्रीय दबावापूढे चिनला देखील झुकावे लागल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, यापूर्वी देशामध्ये रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार होते. त्या सरकारमध्ये पंतप्रधानांचे कोणीच ऐकत नव्हे. मात्र आज संयुक्त राष्ट्रात काय घडलं ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. देशातील १३० कोटी जनतेचा आवाज आज जगाने ऐकला आहे.

अझहर मसूदला दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले हे फक्त मोदीचे यश नाही तर संपूर्ण देशाचे यश आहे. मात्र, ही केवळ सुरूवात आहे. पुढे बघा काय काय होते. आज प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे सांगत विरोधकांनी या उत्सवाच्या वातावरणाचा भंग न करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.