जेव्हा मोदीजी ‘कोची’ चे ‘कराची’ करतात…

जामनगर : पोलीसनामा ऑनसाईन जाहीर भाषण करताना बोलण्याच्या ओघात अनेकदा एखाद्या ठिकाणाचा चुकीचा उल्लेख होऊ शकतो. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या व्यक्तींकडून चूक झाली तर तो मोठा चर्चेचा विषय होतो. पण आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे मोदी यांनी आपली चूक केवळ सुधारली नाही तर त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न करीत उपस्थितीच्या टाळ्या मिळविल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. जामनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विकास योजनांचे भूमिपूजन केले.

हेही वाचा – मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी 

यावेळी बोलताना मोदींनी कोचीचा उल्लेख कराची असा केला. ही चूक लक्षात आल्यावर मोदींनी लगेच सावरून घेतले काय करू हल्ली डोक्यात एकच गोष्ट आहे, असे बोलत त्यांनी चूकीतूनही लोकांच्या टाळ्या घेतल्या. आयुष्यमान भारत योजनेची स्तुती करताना मोदी कोचीऐवजी कराची म्हणाले. तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहात असाल, कोलकाता असो किंवा ‘कराची’ असे मोदी भाषणाच्या ओघात बोलले.

‘जामनगरची एखादी व्यक्ती भोपाळमध्ये गेली आणि तिकडे आजारी पडली तर त्याला उपचारासाठी जामनगरला यायची गरज नाही. आयुष्मान योजनेअंतर्गत कार्ड दाखवल्यावर त्याला कोलकाता असो किंवा कराची फुकट उपचार मिळतील,’ असे मोदी म्हणाले. पण यानंतर लगेच ‘मला कोची म्हणायचे होते कराची नाही, हल्ली माझ्या डोक्यात शेजारी देशाचाच विचार असतो, असा टोमणा मोदींनी मारला.

You might also like