PM Narendra Modi | केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल? उद्या पंतप्रधान PM मोदी, शहा, नड्डा यांची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – काही दिवसापासून केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) फेरबदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. फेरबदल आणि विस्ताराला अंतिम स्वरुप दिले जात असल्याचे खात्रीशीर वृत्त असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा (BJP national president J. P. Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची मंगळवारी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलांसंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. PM Narendra Modi | reshuffle union cabinet inevitable meeting prime minister jp nadda and amit shah

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी प्रत्येक मंत्रालयाच्या मागील दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांशीही यावर सल्लामसलती करण्यात आल्या आहेत. ३० जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधानांनी बैठकीही बोलावली आहे. संसदेचे अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी असू शकतो.

अनेक मंत्र्यांकडे केंद्रातील अनेक खात्यांचा अतिरिक्त पदरभर देण्यात आला आहे. त्यामुळे या विस्तारामध्ये संख्या २६ ते २७ सदस्यांनी वाढू शकते. स्वतंत्र प्रभार असलेले तीन राज्यमंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगलाला मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

या नावांची चर्चा
भाजप (BJP) मधून भूपेंद्र यादव, मीनाक्षी लेखी आणि पक्षाबाहेरील तज्ज्ञांसह नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि अपना दल या दोन मित्र पक्षांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
तर सर्वानंद सोनोवाल (आसाम), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश), वरुण गांधी (उत्तर प्रदेश), दिलीप घोष (पश्चिम बंगाल) अनिल बालुनी (उत्तराखंड), अनुप्रिया पटेल (अपना दल) यांची वर्णी लागू शकते

Web Titel :- PM Narendra Modi | reshuffle union cabinet inevitable meeting prime minister jp nadda and amit shah

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक