PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या पश्चिम बंगाल युनिटने रविवारी कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित रॅलीसाठी कंबर कसली आहे, तर मोदींच्या रॅलीपूर्वी कोलकाता पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सीजकडून शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. या रॅलीने भाजपाच्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचा समारोप होईल, या यात्रेने राज्यातील 294 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले आहेत.

सुरक्षा एजन्सीजने पोडियमच्या समोर चार-स्तरीय बॅरिकेड्स लावले आहेत, जिथून पंतप्रधान मोदी 7 लाखांपेक्षा जास्त समर्थकांना संबोधित करतील. मुख्य व्यासपीठासह दोन आणखी छोटे व्यासपीठ असतील, ज्यापैकी एकावर स्थानिक भाजपा नेते असतील आणि दुसरे व्यासपीठ मीडियासाठी असेल.

कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये आणि त्याच्या जवळपास 1,500 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. सूत्रांनी सांगितले की, मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे एक केंद्रीय देखरेख नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण मैदान लाकडाच्या लॉगने जोडले जाईल.

याशिवाय खबरदारी म्हणून हेस्टिंग्स, कॅथ्रेडल रोड, खिदीरपूर, एजेसी बोस रोड आणि हॉस्टिपल रोडसारख्या वर्दळीच्या भागांवर विशेष करून मालवाहक वाहनांवर आणि अन्य वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावला जाईल. पोलिसांनी म्हटले की, 7 मार्चला रात्री 8 वाजण्याच्या अगोदर कोणतेही बाहेरील सामान कोलकातामध्ये आणण्यास परवानगी दिली जाणार नाही.

संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची देखरेख कोलकाता पोलिसांसह विशेष सुरक्षा गट (एसपीजी) च्या अधिकार्‍यांद्वारे केली जाईल. पंतप्रधान मोदींच्या आगमनाच्या काही दिवस अगोदरपासूनच एसपीजी कमांडोची एक टीम कोलकाता येथे पोहाेचली आहे. रविवारी ब्रिगेड परेड ग्राउंड क्षेत्राजवळ ट्रामची वाहतूकसुद्धा बंद केली जाईल.