Coronavirus : ‘कोरोना’ लसीबाबत PM मोदींचं मोठं विधान, भाजपाच्या जाहिरनाम्यावर केला खुलासा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्याविरूद्ध भारताच्या लढाईसाठी भारतीयांचे कौतूक केले. पीएम मोदी म्हणाले, कोरोना वॅक्सीनबाबत सध्या देशात वाद सुरू आहे. मी भारतातील प्रत्येक नागरिकाला सांगतो की, कोरोनाची वॅक्सीन प्रत्येकाला उपलब्ध करू दिली जाईल आणि कुणीही यातून सुटणार नाही.

कोरोना संकटबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारतात सरकारने वेळेवर घेतलेले निर्णय आणि लोकांच्या मदतीने अनेक प्राण वाचले, लॉकडाऊन लावणे आणि पुन्हा अनलॉकच्या प्रक्रियेत जाण्याची वेळ योग्य होती.

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या इंटरव्ह्यूत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना महामारीदरम्यान भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यात वेगाने सुधारण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे. जगभरातील देश आता भारताच्या बाजारातील ताकदीवर विश्वास करू लागले आहेत. हे गुंतवणुकीसाठी सर्वात पसंतीचे डेस्टिनेशन बनण्यात पुढे आहे. लॉकडाऊन योग्यवेळी केल्याने अनेक जीव वाचवता आले. भारताची अर्थव्यवस्था रूळावर येत आहेत आणि 2024 पर्यंत आपण 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थे लक्ष्य पूर्ण करू.

मोदींच्या इंटरव्ह्यूतील महत्वाचे मुद्दे

1 कोरोना केस कमी होण्याचा अर्थ असा होत नाही की, ही वेळ आनंद साजरा करण्याची आहे. ही वेळ आपले वर्तणूक आणि सिस्टम मजबूत करण्याची आहे.

2 मला वाटते की, आपण ही माहामारी नियंत्रणात ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. लोकांना आता आणखी जागृत केले पाहिजे. कोरोना महामारीला नष्ट करण्यासाठी आवश्यक सामान पुरवले पाहिजे.

3 मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे कायदे होते ते योग्य होते, परंतु एक कमतरता नेहमी जाणवत होती, ती होती ती म्हणजे लेबर लॉ. आता तो आम्ही आणखी मजबूत केला आहे.

4 भारत तोपर्यंत पूर्ण विकसित होणार नाही, जोपर्यंत कामगारांची स्थिती सुधारणार नाही. मला विश्वास आहे की आमच्या सरकारने जे बदल केले आहेत, ते कृषी आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मोठे बदल घडवतील.

5 जेव्हा यूपीए सरकार अंतर्गत वॅटने सीएसटी बदलला, तेव्हा त्यांनी राज्यांना कोणत्याही महसूलाच्या कमतरतेच्या भरपाईचे आश्वासन दिले होते. परंतु तुम्हाला माहिती आहे की, युपीएने काय केले.

6 आम्ही आर्थिक सुधारणेच्या आमच्या मार्गावर आहोत. सर्वप्रथम कृषीमध्ये, जसे की मी पहिल्यांदा म्हटले होते, आमच्या शेतकर्‍यांनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत आणि आम्ही एमएसपीच्या उच्चतम स्तरावर रेकॉर्ड खरेदी सुद्धा केली आहे. आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण उत्पन्न वाढवत आहोत.

7 भारतात विक्रमी एफडीआय भारतातील गुंतवणुकीची वाढ दर्शवते. यावर्षी, महामारी असूनही आम्ही एप्रिल-ऑगस्टसाठी 35.73 बिलियनची उच्चतम एफडीआय प्राप्त केली आहे. ही मागच्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत 13% जास्त आहे.

You might also like