PM मोदींनी दिला देशातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांना संदेश, म्हणाले – ‘गावांना कोरोनापासून वाचवा, लशींच्या पुरवठयासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसर्‍या लाटेविरूद्धच्या लढाईत राज्य आणि जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांना फील्ड कमांडर म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले की, स्थानिक नियंत्रण कक्ष, आक्रमक चाचणी आणि लोकांना योग्य आणि पूर्ण माहिती पुरवणे हे महामारीला पराभूत करण्यासाठी शस्त्र आहे.

मोदी म्हणाले, तुम्ही एक प्रकारे युद्धाचे फील्ड कमांडर आहात. आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत, तेवढीच वेगवेगळी आव्हाने आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची आव्हाने माहित आहेत. यासाठी जेव्हा जिल्हा जिंकतो तेव्हा देश जिंकतो. जेव्हा तुमचा जिल्हा कोरोनाला पराभूत करतो, तेव्हा देश कोरोनाला पराभूत करतो.

राज्य आणि जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवादानंतर आपल्या संबोधनातून पंतप्रधानांनी म्हटले की, कोविड-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेत ग्रामीण आणि दुर्गम भागांवर जास्त लक्ष द्यावे लागेल.

गामस्थ सूचना आत्मसात करतात

पंतप्रधान म्हणाले – मागच्या वेळी आम्ही कृषीक्षेत्र बंद केले नव्हते. मी हे पाहून आश्चर्यचकित झालो होतो की, कशाप्रकारे ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होते. ग्रामस्थ सूचना आत्मसात करतात आणि आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये सुधारणा करतात. ही गावांची ताकद आहे.

पंतप्रधान म्हणाले, जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय गोष्टींसह सर्व गोष्टी योग्य प्रमाणात पोहचल्या पाहिजेत. आपल्या गरजा वेगाने ओळखून, त्यांची व्यवस्था करायची आहे. आव्हान मोठे आहे, परंतु आपले धैर्य त्यापेक्षाही मोठे आहे. आपल्याला संसर्गाला सुद्धा रोखायचे आहे आणि दैनंदिन जीवनाशी संबंधीत आवश्यक पुरवठा विनाअडथळा सुरूठेवायचा आहे.

ते म्हणाले, लसीकरण कोविडशी लढाईचे एक सशक्त माध्यम आहे. यासाठी याच्याशी संबंधीत प्रत्येक संभ्रम दूर करायचा आहे. कोरोना लसीचा पुरवठा खुप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. पीएम केयर्सच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन संयंत्र लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये या संयत्रांनी काम सुरू केले आहे. लस हे कोविडविरूद्ध लढ्याचे सशक्त माध्यम आहे. मोठ्या प्रमाणा लसीचा पुरवठा करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सतत सुरूआहे.