PM मोदींचा खासदारांना ‘फिटनेस मंत्र’ ; ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खासदारांना दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टी (बीजेपी) च्या एससी-एसटी च्या खासदारांना फिट राहण्याचा सल्ला देत काही टिप्स देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनो ४० पेक्षा जास्त वय असणाऱ्या खासदारांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदींनी गुरुवारी झालेल्या एसटी आणि एससी च्या खासदारांच्या झालेल्या बैठकीत हा सल्ला दिला असून या बैठकीस ४४ खासदार उपस्थित होते. मोदींनी म्हटले कि देशसेवेसाठी तुमचे शरीर निरोगी असणे अत्यावश्यक आहे. शारीरिक अस्वास्थ्यामुळे आपले अनेक सहकारी यावेळी आपल्याला सोडून गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत त्यांनी सर्व उपस्थित संसद सदस्यांना आपला सविस्तर परिचय देण्यास सांगितले. त्याचबरोबर खासदारांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देखील मोदींनी मागितली. याआधी मोदी बुधवारी पार्टीच्या सर्व ओबीसी खासदारांची भेट घेतली होती. तर पुढील आठवड्यात मोदी महिला, युवक आणि नवीन संसद सदस्यांना भेटणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदारांची युवक, एसटी-एससी, ओबीसी, महिला आणि अन्य वर्गांमध्ये विभागणी केली असून त्यानुसार त्यांची बैठक घेता आहेत.
सातत्याने एकापाठोपाठ होणाऱ्या या बैठकांमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही संसद सदास्यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांशी ते संसदीय गोष्टींसंदर्भात तसेच त्या त्या क्षेत्रातील कामकाजासंदर्भात चर्चा करत आहेत.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा