नशिबवान ! चक्‍क PM नरेंद्र मोदींच्या ‘अंगा-खांद्या’वर खेळलं ‘हे’ बाळ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बाळासोबत फोटो काढून इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान बाळासोबत खेळताना दिसून येत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे बाळ कोणाचे आहे यावर जोरात चर्चा सुरु झाली आहे. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. हे बाळ भाजपचे राज्यसभा सदस्य सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी विविध पाहुण्यांच्या भेटी घेत असतात. यामध्ये देश विदेशातील पाहुण्यांचा देखील समावेश असतो. आज मंगळवारी त्यांना भेटायला एक विशेष पाहुणा आला. हा पाहुणा मोदींना इतका आवडला की त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर टाकण्याचा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवरता आला नाही.

या लहान बाळासोबतचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले की, आज संसदेत एक खास मित्र मला भेटायला आला आहे. या फोटोमध्ये टेबलावर काही चॉकलेट देखील दिसत आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर असताना त्यांचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये पंतप्रधान एका लहान मुलाचा कान ओढताना दिसून येत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त