सोशल मीडिया सोडणार नाहीत PM मोदी, 16 तासानंतर स्वतः सांगितलं काल रात्रीच्या ट्विटचं ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्या सस्पेंसवरील पडदा हटवला ज्यात त्यांनी सोशल मीडिया सोडण्याचे सांगितले होते. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की या महिला दिनी ते आपले सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना समर्पित करतील ज्यांच्यामुळे ते प्रेरित झाले आहेत. 16 तासानंतर पीएम मोदींनी या सस्पेंसवरुन पडदा हटवत घोषणा केली की महिला दिनाच्या या विशेष प्रसंगी सुरु झालेल्या मोहिमेत (कँपेन) कोणीही सहभागी होऊ शकते.

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी ट्विट केले की या महिला दिनी मी माझे सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना समर्पित करेल ज्यांच्या जीवनाने आणि कामाने मला प्रेरित केले. ते त्या लाखोंना प्रेरित करण्यासाठी प्रोस्ताहन देतील.

पंतप्रधान पुढे म्हणाले, तुम्ही ती महिला आहात किंवा तुम्ही अशा कोणत्या महिलेला ओळखतात ज्यांनी तुम्हाला प्रेरित केले आहे ? तुमची अशी कोणती कथा असेल तर ती सांगा. #SheInspiresUs असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला.

असा संभाळता येणार पीएम मोदींचा सोशल मीडिया –
पंतप्रधान मोदींच्या या कॅंपेन अंतर्गत काही महिलांना पीएम मोदींचे सोशल मीडिया अकाऊंट वापरण्याची संधी मिळेल. यात ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम याचा समावेश आहे. हे अकाऊंट महिला दिनी या महिला संभाळतील. तुम्ही तुमची कथा सांगून या मोहिमेत सहभागी होऊ शकतात.

सोमवारी पंतप्रधान मोदींच्या ट्विटने सस्पेंस –
सोमवारी रात्री 8.56 वाजता पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते, ज्यानंतर खळबळ उडाली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणले होते की रविवारी ते आपले फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब सारखे सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. यानंतर ट्विटरवर काही मिनिटातच #NoSir ट्रेंड होण्यास सुरुवात झाली होती, ज्यात पंतप्रधान मोदींना त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया न सोडण्याचे आवाहन केले होते.