India Ideas Summit : भारत आज ‘संधी’ देणारा देश, 22 टक्क्यांनी करतोय ‘प्रगती’ : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगाला चांगल्या भविष्याची गरज आहे हे आपण सर्वजण मान्य करतो. आपल्या सर्वांनाच एकत्रितरित्या भविष्याला आकार द्यायचा आहे. भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन मुख्यत: अधिक मनुष-केंद्रीत असणे आवश्यक आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. भारतात अनेक संधी उपलब्ध असून अमेरिकन कंपन्यांसाठी गुंतवणूकीचे पर्यायही उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.


यूएस-इंडिय बिझिनेस कौन्सिल या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. या वर्षी यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिलच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेच्या लोकांना संबोधित केले.


पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे
– पीएम मोदी म्हणाले, की भारत तुम्हाला आरोग्य क्षेत्रात गुंतवणूकीचे आमंत्रण देत आहे. भारताची आरोग्य सेवा 22 टक्क्यांनी वाढत आहे.
– ऊर्जा क्षेत्रात देखील गुंतवणूक करण्यासाठी भारत आपल्याला आमंत्रित करत आहे. उर्जा क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. क्लीन एनर्जीच्या क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी संधी उपलब्ध आहे. भारत सध्या स्वत:ला गॅस बेस्ड अर्थव्यवस्थेत बदल आहे.
– तुम्हाला भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास आमंत्रित करत आहे. भरतात सर्वात मोठे इन्फ्रस्टक्चर सुरु आहे.
– संरक्षण आणि स्पेस क्षेत्रात गुंतवणुकी करण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही संरक्षण गुंतवणूकीसाठी एफडीआय मर्यादा 74 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.
– पंतप्रधान म्हणाले, वित्त व विमा क्षेत्रात गुंतवणूक करावी. विमा क्षेत्रात आम्ही 100 टक्के एफडीआय मंजूर केला आहे.
– पंतप्रधान मोदी आपल्या संबोधनात म्हणाले की, भारतात गुंतवणूकीची संधी मोठी आहे. भारत तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीत गुंतवणुकीसाठी आमंत्रित करत आहे.
– पंतप्रधान म्हणाले, आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी आम्ही तुमच्या भागीदारीची प्रतिक्षा करत आहोत.
– पंतप्रधान मोदी म्हणाले, यूएसआयबीसी यावर्षी आपला 45 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. जगाला चांगल्या भविष्याची गरज आहे असे आपण सर्वजण मान्य करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगले भविष्य दिले पाहिजे.

यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिल म्हणजे काय
यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिलची स्थापना 45 वर्षापूर्वी 1975 मध्ये भारत व अमेरिकेत खासगी क्षेत्रात गुंतवणुकीचा प्रवाह वाढवण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी एक व्यावसायिक सल्लागार संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था व्यवसाय आणि सरकारी नेत्यांमध्ये थेट दुवा म्हणून काम करते.