‘स्वावलंबी’ भारताची ही भव्य इमारत ‘या’ 5 खांबावर आधारीत : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या 17 मे रोजी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. अद्यापही देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली आहे. आज पंतप्रधानांनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
त्याच बरोबर 21 वं शतक भारताचं आहे, अस मागच्या शतकापासून आपण ऐकत आलोय. कोरोना संकटानंतरही जगात निर्माण होणारी स्थिती न्याहाळत आहोत. भारताच्या नजरेतून पाहिलं तर 21 वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर आपली जबाबदारी असावी. जागतिक स्थिती आपल्याला एक मार्ग दाखवतेय असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्वावलंबी भारताची संकल्पना मांडली. स्वावलंबी भारताची ही भव्य इमारत पाच खांबावर आधारीत असेल असे त्यांनी सांगितले.

स्वावलंबी भारताचे 5 खांब
1. अर्थव्यवस्था – एक अशी अर्थव्यवस्था जी Incremental Change नाही तर Quantum Jump आणेल.
2. पायाभूत सुविधा – पायाभूत सुविधा आधुनिक भारताची ओळख बनेल.
3. प्रशासन व्यवस्था – आपली नवी व्यवस्था 21 व्या शतकाचं स्वप्न साकार करणारी टेक्नॉलॉजी व्यवस्थेवर आधारीत असेल.
4. लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) – व्हायब्रन्ट डेमोग्राफी ताकद आहे. डेमोग्राफी स्वावलंबी भारतासाठी ऊर्जा स्त्रोत ठरेल.
5. 20 लाख कोटींच आर्थिक पॅकेज – भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा पूर्ण क्षमतेनं वापलं जाण्याची गरज आहे. मागणी वाढवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण सक्षम असायला हवा. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.