‘धरती’ आपली ‘आई’, 2.6 कोटी हेक्टर जमीनीला ‘पिकाऊ’ बनवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रेटर नोएडा येथील एक्सपो मार्ट येथे कॉप – 14 च्या 12 दिवसांच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल वार्मिंग, हवामान बदल आणि नष्ट होत चाललेली जैवविविधता, अशा धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली.

पीएम मोदी यांनी घोषणा केली की, भारत सरकार 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर नापीक जमीन सुपीक करेल. पूर्वी हे लक्ष्य 21 दशलक्ष हेक्टर होते. त्यांनी सांगितले की 2015 ते 2017 दरम्यान भारतातील झाडे व जंगलांच्या क्षेत्रात आठ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. मोदी म्हणाले की, हवामान बदल, जैवविविधता आणि जमीनीचा ऱ्हास यासारख्या क्षेत्रांमध्ये उपाययोजना प्रस्तावित करण्यात भारत आनंदी आहे.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी –
भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीला पवित्र माणले जाते. आज जगातील लोक हवामान बदलाच्या मुद्दयावर नकारात्मक विचारसरणीचा सामना करीत आहेत. वातावरण वाचवण्यासाठी आपण प्रथम आपले वर्तन बदलले पाहिजे. लवकरच जगाला प्लास्टिकवर बंदी घालावी लागेल. क्लीन इंडिया मिशन अंतर्गत भारताने बरेच यश मिळवले आहे.

यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, वाढत्या वाळवंटी प्रदेशापासून बचाव करण्याच्या दृष्टीने भारताने बरीच पावले उचलली आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भारताने उल्लेखनीय काम केले आहे. हेच कारण आहे की जगातील 77 टक्के वाघ फक्त भारतात आहेत.
जावडेकर पुढे म्हणाले की, वाढत्या ग्लोबल वार्मिंग आणि प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी भारताने ई-वाहनांना करात सूट देऊन प्रोत्साहित केले आहे. मानवी कृतींमुळे जर पर्यावरणीय बदल होत असतील तर त्यातील सकारात्मक योगदानाने त्यात सुधारणा होईल.

काय आहे COP 14 –
कॉन्फ्रेंस ऑफ द पार्टीज (सीओपी) ही संमेलनाची सर्वोच्च निर्णायक संस्था आहे. अधिवेशनाचे सर्व राज्ये जे त्याचे प्रतिनिधी आहेत ते सर्व कॉपमध्ये भाग घेतात आणि मागील अधिवेशनात ज्या गोष्टी ठरविण्यात आल्या त्या अंमलात आणल्या गेल्या आहेत की नाही यावर चर्चा करतात.

आरोग्यविषयक वृत्त –