‘कलम ३७०’चा वापर ‘देशविरोधी’ भावना भडकविण्यासाठी केला गेला : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा संबंधी कलम ३७० आणि कलम ३५ ए हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करीत आहेत. देशाला दिलेल्या संदेशामध्ये पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाशी संबंधित अनुच्छेद ३७० मधील तरतुदी रद्द करण्याच्या व राज्याचे दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन करण्याच्या निर्णयाबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलम ३७० आणि ३५ ए ने जम्मू-काश्मीरला फुटीरतावाद, दहशतवाद, कौटुंबिकता आणि व्यवस्थेमधील सर्रासपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराशिवाय काही दिले नाही. या दोन्ही कलमाचा वापर पाकिस्तानकडून काही लोकांच्या देशाविरूद्ध भावना भडकवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, करोडो देशभक्तांच स्वप्न पूर्ण झालं आहे. जम्मू काश्मीरमधील नागरिक विकासापासून वंचित होते. एक राष्ट्र म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण, आम्ही, संपूर्ण देशाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी एक प्रणाली, ज्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आमच्या भावंडांना बर्‍याच अधिकारांपासून वंचित ठेवले गेले होते, जे त्यांच्या विकासामध्ये एक मोठा अडथळा होता, आता आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने ती दूर झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त