विवेक ओबरॉयला चक्क जिवे मारण्याच्या धमकीचे फोन, पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉयचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शानाला अनेकवेळा विरोध झाला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकल्यात येत होती. आता विवेक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वादग्रस्त ट्विटग्रस्त चर्चेत असलेला विवेक ओबरॉयला चक्क जिवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहे.

याबाबत विवेकने पोलिसांकडे तक्रार ही केली आहे. तक्रार केल्यानंतर आता मुंबई पोलीसांनी विवेकच्या घराबाहेर दोन पोलीस कॉन्स्टेबलचा बंदोबस्त केला आहे. एग्झिट पोल जेव्हा जाहीर झाले. यानंतर शेअर केलेल्या मीममुळे विवेक संकटात सापडला आहे. एग्झिट पोल म्हणजे अतिम निकाल नाही हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा मीम विवेकने पोस्ट केला होता. यावरुन सर्व राजकीय नेते आणि त्यांच्यासोबत बॉलिवूडच्या कलाकारांनी सुद्धा विवेकवर टिका

राज्य व केंद्रिय महिला आयोगाने नोटीसही पाठविली आहे. सगळ्यांकडून होणाऱ्या टिकेवर विवेकने व्टिट डिलीट करुन सर्वांची माफी देखील मागितली आहे. विवेकचा आगामी चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ खुपच चर्चेत आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.