अमेरिकेहून परतताच PM मोदींनी जागवल्या 3 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ रात्रीच्या आठवणी ! म्हणाले – रात्रभर झोपू शकलो नव्हतो…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या दौर्‍यावरून दिल्लीत दाखल झाले. त्यांचे दिल्लीत भव्य स्वागत झाले. दिल्लीच्या पाम टेक्निकल क्षेत्रात दिल्लीचे सर्व ७ खासदार आणि हजारो भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या समर्थकांना अभिवादन केले आणि म्हटले जगात भारताचे मूल्य वाढले आहे. यावेळी त्यांनी तीन वर्षांपूर्वीच्या २८ सप्टेंबरच्या रात्रीचा उल्लेखही केला.

सर्जिकल स्ट्राईकची रात्री आठवत ते म्हणाले, ‘आज २८ सप्टेंबर आहे आणि तीन वर्षांपूर्वी २८ सप्टेंबरला मी रात्रभर एका कारणामुळे झोपू शकलो नाही. मी रात्रभर जागा राहून प्रत्येक क्षण मोजत फोन कधी वाजतो याची, वाट पाहत बसलो होतो. त्या दिवशी भारताच्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची सुवर्ण गाथा लिहिली. त्या रात्री देशातील शूर सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक करून भारताची आन, बान आणि शान उंचावत भारताचे सामर्थ्य जगासमोर ठेवले.

सैनिकांच्या उत्साहाला पंतप्रधानाच अभिवादन :
ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, “आज, २८ सप्टेंबरची ती रात्री आठवत मी आमच्या शूर सैनिकांच्या उत्साहात आणि शौर्यास नमन करतो जे मरण मुठीत घेऊन देशासाठी लढत असतात.” भारतीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, ‘नवरात्रोत्सव भारताच्या कानाकोपऱ्यात सुरू होत आहे. शक्तीपूजनाचा उत्सव भारताच्या कानाकोपऱ्यात सुरू होत आहे. यासाठी मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.’

पीएम मोदी म्हणाले, ‘जगातील लोकांची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. जगभरात भारताबद्दलचा आदर वाढला आहे. संपूर्ण श्रेय भारतीय जनता आणि जगभर पसरलेल्या भारतीय जनतेला जाते.’

काय झाले २९ सप्टेंबर २०१६ रोजी ?
२८ सप्टेंबरचा दिवसाविषयी इतिहासात अशी नोंद आहे की भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट करण्याचे धाडसी पाऊल उचलले. वास्तविक, जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ सैनिक शहीद झाले होते. १८ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात होते.

या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरूद्ध सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी छावण्या नष्ट केल्या. पाकिस्तानविरूद्ध केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सैन्याने सीमेभोवती लपलेल्या घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांना ठार केले होते.

Visit : Policenama.com