आता Income Tax Refund साठी करावी लागणार नाही प्रतीक्षा, काही आठवड्यांमध्ये मिळतोय रिफंड : पीएम नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले की, आज टॅक्सपेयर्सला पूर्ण टॅक्स व्यवस्थेत मोठे बदल दिसत आहेत आणि त्यांना हे जणावतदेखील आहे. पंतप्रधानांनी कार्यक्रमात सांगितले की, करदात्यांना रिफंडसाठी अनेक महिने वाट पाहावी लागत होती, परंतु त्यांना काही आठवड्यांमध्येच रिफंड मिळतो. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओडिसाच्या कटकमध्ये प्राप्तीकर अपीलीय न्यायाधीकरण कार्यालयासह निवासी परिसराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

पीएम मोदी यांनी आपल्या वक्तव्यात प्राप्तीकर आणि सिस्टिमबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. मोदींनी जुन्या काळातील उल्लेख करत म्हटले की, ते टॅक्स देणारा आणि टॅक्स कलेक्टर दोघांच्या नात्यात खूप ओढाताण होती आणि त्याकडे शोषित आणि शोषक म्हणून पाहिले गेले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर जी टॅक्स व्यवस्था होती, त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न झाला नाही.

यादरम्यान मोदी म्हणाले, सामान्य लोकांकडून टॅक्स घेताना कुणालाही त्रास होऊ नये, परंतु टॅक्समधून आलेला पैसा नागरिकांपर्यंत पोहाेचावा, त्यांना पैशाचा वापर माहीत असायला हवा.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ढग बरसले की त्याचा लाभ सर्वांना मिळतो. परंतु ढग बनताना सूर्य पाण्याला शोषून घेतो, परंतु यामुळे कुणाला त्रास होत नाही. अशाच प्रकारे शासनानेसुद्धा असायला हवे. करदात्याला फेसलेस अपिलाची सुविधा मिळते, तेव्हा त्यास टॅक्स पारदर्शकतेची जाणीव होते.

टॅक्स व्यवस्थेवर ते म्हणाले, अगोदरच्या सरकारांमध्ये टॅक्स टेररिझमच्या तक्रारी असत. परंतु, आता देश टॅक्स ट्रान्सफरन्सीकडे चालला आहे. या बदलाचे मुख्य कारण रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म आहे. नियमांमध्ये बदल करत आहोत आणि या प्रक्रियेत टेक्नॉलॉजीची भरपूर मदत घेतली जात आहे. आमचे धोरण आणि हेतू स्पष्ट आहे. भारतात टॅक्सपेयरचे अधिकार आणि कर्तव्य दोन्हीला कोडिफाय केले आहे. त्यांना कायद्याची मान्यता आहे. टॅक्सपेयर आणि टॅक्स कलेक्ट करणार्‍यांमध्ये विश्वास बनवण्यासाठी पारदर्शकता हे मोठे पाऊल आहे.