PM मोदी उद्या दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, देवू शकतात चीनला मोठा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना संकट आणि चीनबरोबरच्या ताणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.30) दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषात चीनला झटका देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.29) देशात लोकप्रिय असलेल्या 59 चायनीज अ‍ॅपवर बंदी घालण्याची घोषणा केली.

देशात वाढती कोरोना बाधितांची संख्या आणि चीनबरोबर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी मंगळवारी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, देशात अनलॉक 2.0 सुरु करण्यात आले असून सोमवारी रात्री गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पंतप्रधान कार्य़ालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार असल्याची माहिती दिली आहे.

मंगळवारी संध्याकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले भाषण देणार आहेत. पंतप्रधान मोदी 30 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. एकीकडे देशात कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संर्घषानंतर चीनशी तणावाचे वातवरण आहे. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश वासियांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, टोळ हल्ला, लडाखमधील परिस्थितीबाबतचा उल्लेख केला होता.