मुंबईसह ‘या’ 3 ठिकाणच्या हायटेक टेस्ट लॅबचं PM मोदींच्या हस्ते 27 जुलैला उद्घाटन, दररोज 10 हजार ‘कोरोना’ नमुन्यांची होणार तपासणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 27 जुलै रोजी तीन प्रयोगशाळांचे उद्घाटन करतील. या तीन प्रयोगशाळा उच्च श्रेणीच्या असतील, जे दररोज 10 हजार कोविड – 19  नमुन्यांची चाचणी घेऊ शकतात. पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रयोगशाळेची केंद्रे सुरू करणार आहेत. ही तीन चाचणी केंद्रे आयसीएमआर नोएडा, मुंबई आणि कोलकाता येथे सुरू होणार आहेत. ही तीन केंद्रे आयसीएमआर राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था नोएडा, आयसीएमआर राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई आणि आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा आणि आंत्र रोग  संस्था कोलकाता येथे सुरू करण्यात आली आहेत.

या चाचणी केंद्रांच्या उद्घाटनादरम्यान आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. विशेष म्हणजे या लॅब सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. इतकेच नव्हे तर कोरोनाव्हायरस महामारी संपल्यानंतर एचआयव्ही, डेंग्यू, हिपॅटायटीस बी आणि सी या इतर आजारांसाठी या प्रयोगशाळेची तपासणी करण्यात येणार आहे.

लवकरच दररोज 10 लाख कोरोना नमुन्यांची केली जाणार चाचणी
रविवारी देशात कोरोना विषाणूची एकूण सकारात्मक प्रकरणे रविवारी 13,85,522 वर पोहचली. तर कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या 8,85,577 एवढी आहे. रविवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत कोविड – 19 ची  48,661 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर याकाळात  705  लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात देशात रोज येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामागील एक मोठे कारण म्हणजे कोरोनाची वाढती  चाचणी. गेल्या काही दिवसांत चाचण्यांची संख्या बरीच वाढली आहे. 25 जुलै पर्यंत देशभरात 1,62,91,331 कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर एका दिवसात म्हणजेच 25 जुलै रोजी 4,42,263 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.

चाचणी क्षमता वाढविण्यावर भर देत आहे  सरकार
जवळजवळ दररोज चाचणीचे आकडे वाढत आहेत. या चाचणीची क्षमता शक्य तितकी वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दररोज  10 लाख   चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी केंद्र सरकार वारंवार राज्यांना चाचण्यांची संख्या वाढविण्यास सांगत आहे. कारण चाचण्यांची संख्या वाढवून आरोग्य मंत्रालय वेळोवेळी कोरोना संसर्ग ओळखण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून वेळेवर उपचार करणे शक्य होईल.