माझ्यासाठी 5 मिनिटं उभे राहण्याची मोहिम म्हणजे ‘खुरापत’ वाटतेय : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही उत्साही समर्थकांना फटकारले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे की, त्यांच्या लक्षात आणून दिले गेले आहे की काही लोक 5 मिनिटे उभे राहून मोदींचा सन्मान करण्याची मोहीम राबवित आहेत. पहिल्यांदा तर हा मोदींना वादात ओढविण्यासाठी एखादा कट वाटतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कदाचित ही एखाद्याची सदिच्छा असेल, तरीही आग्रह आहे कि, जर खरोखरच तुमच्या मनात प्रेम असेल आणि मोदींचा सन्मान करायचा असेल तर कमीतकमी तोपर्यंत एखाद्या गरीब कुटुंबाची जबाबदारी घ्या, जोपर्यंत कोरोना विषाणूचे संकट आहे. माझ्यासाठी यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणताही असू शकत नाही.

दरम्यान, काही लोक येत्या रविवारी म्हणजेच 12 एप्रिलला 5 मिनिटे उभे राहून पंतप्रधान मोदींचा सन्मान करण्यासाठी सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. या संदर्भात लोक ट्विटर-फेसबुकवर मेसेज शेअर करत आहेत. मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतर असे अनेक संदेश हटविण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी ही मोहीम चुकीची असल्याचे सांगत म्हटले कि, की जर एखाद्याने मला आदर द्यायचा असेल तर जोपर्यंत कोरोना विषाणूचे संकट आहे, तोपर्यंत एखाद्या गरीब कुटुंबाची जबाबदारी घ्या, याच्यापेक्षा मोठा सन्मान कोणताच असणार नाही. पीएम मोदी म्हणाले की 5 मिनिटे उभे राहण्याची मोहीम चुकीची आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर देशातील नागरिकांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे पालन केले. यानंतर पीएम मोदी यांनी 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता पीएम मोदींनी लोकांना 9 मिनिटांसाठी दिवे लावण्याचे आवाहन केले. लोकांनी मोठ्या उत्साहात त्याचे अनुसरण केले.