PM मोदींनी केलं आश्चर्यकारक ट्विट, म्हणाले – ‘सोशल मीडिया सोडण्यावर विचार करतोय’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धक्कादायक ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा विचार करत आहेत. या विषयीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
कदाचीत ते समाज माध्यमाच्या जगातून कायमचा रामराम ठोकण्याचा विचारात असल्याचे या ट्विटवरून दिसत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे राजकीय नेते आहेत. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे 53.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी फेसबुकवर चार करोड 47 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे. या शिवाय इन्स्टाग्रामवर त्यांचे 35.2 मिलीयन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींचे युट्यबर साडेचार मिलीयन सबस्क्रायबर आहेत.
Give up hatred, not social media accounts. pic.twitter.com/HDymHw2VrB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2020
पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटरनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विषयी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदी यांना ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे ट्वीट शेअर करत राहुल गांधी म्हणाले, द्वेष सोडा, सोलश मीडिया नाही. तर काँग्रेसचे नेते अधीर रंजन म्हणाले, सोशल मीडिया सोडण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: डिजीटल इंडियाचे स्वप्न बघत आहेत तर ते सोशल मीडियापासून दूर जाण्याचा विचार देखील कसे करू शकतात.