UAE मध्ये पोहचले PM नरेंद्र मोदी, आज होणार ‘ऑर्डर ऑफ जायद’ ने सन्मान

अबुधाबी : वृत्तसंस्था – फान्सचा दौरा पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युएईमध्ये पोहचले असून युएई येथील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ने मोदींचा आज सन्मान करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यांवर आहेत. फान्समधील दौरा पूर्ण करुन ते अबुधाबी येथे पोचले. शहजादे शेख मोहम्मद बिन जायद यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या चर्चेत आर्थिक संबंध अधिक मजबूत बनविण्यावर भर देण्यात येणार आहे.

युएई दौऱ्यांत नरेंद्र मोदी यांना युएईचा सर्वोच्च नागरिक सन्मान जायद मेडल ने सन्मानित केले जाईल. दोन्ही देशामधील द्विपक्षीय संबंधांना वाढ केल्याबद्दल राजा, राष्ट्रपती आणि राष्ट्राध्यक्ष यांना दिला जाणारा नागरिक सन्मान मोदी यांना जाहीर करण्यात आला होता.

अबुधाबीनंतर ते बहरीन के शाह शेख हमाद बिन इसा अल खलिफा यांच्याशी चर्चा करणार आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने बहरीनला आतापर्यंत भेट दिलेली नाही. बहरीनला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like