PM मोदी सोशल मीडियाचेही किंग, 336 कोटी रुपये ब्रॅण्ड व्हॅल्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात त्यांंनी ट्विटर, यूट्यूब, गुगल सर्चच्या ट्रेडिंग चार्टमध्ये टॉपवर आहेत. एका अभ्यासानुसार त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू सुमारे 336 कोटी रुपये आहे.

या प्लॅटफॉर्मवर 2,171 ट्रेंड घेऊन पंतप्रधान मोदी आघाडीवर होते. त्यांच्यापाठोपाठ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी 2,137 ट्रेंड मिळवले.

हे नेतेही ट्रेंडिंग
ऑनलाइन सेंटीमेंट अ‍ॅनॅलिसीस कंपनी चेकब्रँडच्या मते, त्यानंतर ट्रेंड करणार्‍या इतर नेत्यांमध्ये पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे.

देशाच्या आघाडीच्या 95 नेत्यांनी आणि 500 प्रभावशाली सोशल मीडिया व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या संशोधनात ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान चेकब्रँडने ऑनलाइन संशोधनाचा सखोल अभ्यास केला.

या अभ्यासानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 च्या ब्रँड स्कोअरचे एकत्रीकरण केले आहे, जे त्याच्याजवळच्या प्रतिस्पर्धी नेत्याच्या तुलनेत दुप्पट आहे. सेंटीमेंट, फॉलोअर, एंगेजमेंट, मेन्स आणि ट्रेंड – 5 पॅरामीटर्सच्या आधारावर या ब्रँड स्कोअरची गणना केली गेली. चेकब्रँडच्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह यांनी 36. 43 आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 27.03 असे ब्रँड स्कोअर मिळविली आहे. आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना 31. 89 गुण, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पेमा खंडू यांना 31.89 गुण मिळाले आहेत.

ब्रँड व्हॅल्यू म्हणजे काय ?
अभ्यासानुसार पीएम मोदी यांची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 336 कोटी रुपये असून, त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांचे ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपये आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ब्रँड व्हॅल्यू 328 कोटी आहे. हे ब्रँड व्हॅल्यू सोशल मीडियाच्या एंगेजमेंट आणि फॉलोअर्सच्या आधारे तयार केले गेले आहे.