अमेरिकेतून परतल्यानंतर PM मोदींचं 20 हजार कार्यकर्ते दिल्ली विमानतळावर स्वागत करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या 74 व्या सत्राला काल संबोधित केले. 17 मिनिटाच्या आपल्या भाषणात त्यांनी अनेक राष्ट्रांना संदेश दिला. त्यानंतर आता त्यांनी भारतात परतण्याची तयारी सुरु केली आहे. भारतात परतल्यानंतर मोदी यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर जवळपास 20 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच दिल्लीतील सर्व खासदार आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत आपला संदेश अतिशय उत्तमपणे मांडला. तसेच भारताने जगाला युद्ध आणि तर बौद्ध दिला, असेदेखील म्हटले. तसेच पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी तसेच प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्र येणे गरज असल्याचे मत देखील त्यांनी या भाषणात व्यक्त केले. त्यामुळे आम्ही जेव्हा दहशतवादाविरुद्ध आवाज उठवतो त्यावेळी आमच्या मागणीत गांभीर्य असते.

दहशतवाद एका देशाची समस्या नाही
तसेच त्यांनी याविषयी अधिक बोलताना म्हटले कि, दहशतवाद हा केवळ एका देशाची समस्या नसून संपूर्ण जगाची आहे. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाने एकत्र येणे गरजेचे आहे. मानवतेसाठी जगाला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत.

आमचा प्रयत्न संपूर्ण जगासाठी
विकासाचा आमचा प्रयत्न आहे, मात्र याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. आमचे प्रयत्न हे संपूर्ण जगासाठी असून आमच्याप्रमाणे प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रांकडे पाहून आम्हाला देखील प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या वर्षी महात्मा गांधी यांची यावर्षी १५० वी जयंती साजरी केली जाणार असून यावर्षी जगातील सगळ्यात मोठी निवडणूक पार पडली असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

Visit : Policenama.com