PM Narendra Modi | ‘हे बजेट करोडो देशवासियांचे आयुष्य बदलेल’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
155
PM Narendra Modi | union budget 2023-24 live updates nirmala sitharaman speech 1 february 2023
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi | अर्थमंत्री निर्मला सितारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यावेळी विविध क्षेत्रांसाठी केंद्राकडून कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली. यात करदात्यांना दिलासा दिला गेला असून यात आता सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची घोषणा यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. तर यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वसमावेशक बजेट सादर केल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार मानले.

 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारतातील महिलांचं आयुष्य सोपं करण्यासाठी गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक पावलं उचलली. यासह महिला बचत गट हे एक सामर्थ्यशाली क्षेत्र भारतात पसरू लागलं आहे. त्यांना थोडंसं पाठबळ मिळालं, तर त्या जादू करून दाखवू शकतात. त्यामुळे महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात नवी तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी विशेष बचत योजना सुरू केली जात आहे. या योजनेमुळे सामान्य महिलांना मोठी ताकद मिळणार आहे.’

 

तर यावर पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मी देशवासीयांना आवाहन करतो की या, एक नवा अर्थसंकल्प तुमच्यासमोर आहे. नवा संकल्प घेऊन वाटचाल करुया. २०४७ मध्ये प्रत्येत अर्थाने संपन्न भारत आपण बनवुया, चला, या यात्रेला आपण पुढे चालवू.’ असे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधताना केले.

दरम्यान, केंद्र शासनाकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एक करोड शेतकऱ्यांना ऑरगॅनिक फार्मिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यात रासायनिक खतांना पर्यायी असलेल्या सेंद्रीय खतांबद्दल व त्याच्या योग्य वापराबद्दलचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
असे यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.

 

तसेच, बजेटच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की,
सबंध जगाचे लक्ष हे भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

 

Web Title :- PM Narendra Modi | union budget 2023-24 live updates nirmala sitharaman speech 1 february 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण