PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra…
PM Narendra Modi | vaccine children age 15 18 yrs cost process pm modi third dose corona precaution vaccine booster dose
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Narendra Modi | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी व्हॅक्सीनची घोषणा केली आहे. पीएमच्या घोषणेनंतर प्रत्येक आई-वडिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाईल? रजिस्ट्रेशन कसे होणार? व्हॅक्सीनमध्ये तीन महिन्यांचे अंतर असेल तर ते परीक्षा कसे देणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही सांगणार आहोत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हॅक्सीनच्या नावाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. DCGI ने Covaxin च्या मुलांना देण्यात येणार्‍या व्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे. 12 ते 18 वर्षाच्या मुलांना ही व्हॅक्सीन आपत्कालीन स्थितीत देता येऊ शकते. जोर देऊन सांगण्यात आले आहे की, केवळ 12 वर्षावरील वयाच्या मुलांनाच कोव्हॅक्सीन दिली जाईल.

 

माहिती मिळाली आहे की, केंद्र सरकारद्वारे भारत बायोटेकला मुलांच्या व्हॅक्सीनसाठी ऑर्डर दिली जाईल. परंतु किती टप्प्यात आणि कुणाला अगोदर, कुणाला नंतर, या बाजूंवर अजूनपर्यंत सरकारने निर्णय घेतलेला नाही. अशावेळी केंद्राच्या धोरणावर सुद्धा खुपकाही अवलंबून राहणार आहे.

 

कोव्हॅक्सीनच्या अगोदर मुलांसाठी जायडस कॅडिला व्हॅक्सीनवर सुद्धा मंथन झाले आहे. त्या व्हॅक्सीनचे तीन डोस घेणे आवश्यक आहे. त्या व्हॅक्सीनमध्ये सिरिंजचा वापर होत नाही. सध्यासाठी सरकारने इमर्जन्सी वापरासाठी कोव्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे.

 

मुलांचे रजिस्ट्रेशन कसे होईल?
सध्या देशात जी व्यवस्था आहे, तिच्यानुसार कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागते. यानंतर स्लॉट मिळतो. मुलांच्या व्हॅक्सीनबाबत सध्या काही स्पष्टता नाही. अ‍ॅपवर स्लॉट बुकिंग दरम्यान आधार कार्ड नंबर द्यावा लागतो.

अनेक मुले अशी आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही. शक्यता आहे की, मुलांसाठी वेगळी सेंटर बनवली जातील. देशात अनेक फ्रंट लायनर गाव, प्रभाग आणि शेतात जाऊन व्हॅक्सीन देत आहेत. अशावेळी शक्यता आहे की, मुलांना त्यांच्या घरी किंवा शाळेत व्हॅक्सीन दिली जाऊ शकते, जेणेकरून संसर्गाच्या धोक्यापासून त्यांचा बचाव होईल.

 

तर मुले परीक्षा कशी देणार?
18 वर्षावरील लोकांच्या व्हॅक्सीनेशनमध्ये 90 दिवसांचे अंतर ठेवले होते. मध्यंतरी ते कमी केले. तीन जानेवारीपासून मुलांसाठी व्हॅक्सीनेशन सुरू होत आहे. तज्ज्ञांनुसार, जर मुलांनी मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा दिली तर त्यांच्या दुसर्‍या डोसची तारीख जवळ आलेली असेल आणि जरी डोस घेतला तरी संसर्गापासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहू शकतात.

 

मुलांच्या व्हॅक्सीनची किंमत किती?
सध्या देशात मोफत आणि ठराविक रक्कम देऊन व्हॅक्सीनेशनची व्यवस्था आहे.
काही लोक सरकारकडून बनवलेल्या सेंटर्सवर जाऊन व्हॅक्सीन घेत आहेत तर काहीजण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेमेंट करून व्हॅक्सीन घेत आहेत.
यामुळे शक्यता आहे की मुलांसाठी सुद्धा दोन्ही व्यवस्था असतील.

पीएम मोदी मुलांच्या आणि प्रौढांच्या डोसबाबत काय म्हटले
PM मोदी यांनी म्हटले की, 15 ते 18 वर्षाच्या वयाच्या दरम्यानची जी मुले आहेत, त्यांच्यासाठी व्हॅक्सीनेशन सुरू होईल.
पुढील वर्षी 3 जानेवारीपासून याची सुरुवात केली जाईल. यामुळे शाळा-कॉलेजच्या मुलांना कोरानाविरूद्ध सुरक्षा मिळेल.
15 ते 18 वर्षाच्या मुलांच्या व्हॅक्सीनेशनने 10वी-12वीचे विद्यार्थी निश्चिंत होऊन परीक्षा देतील.

 

पीएम मोदी म्हणाले की, हेल्थकेयर आणि फ्रंटलाइन वर्कर्सला व्हॅक्सीनचा प्रीकॉशन डोस सुद्धा दिला जाईल.
ज्याची सुरुवात पुढील वर्षी 10 जानेवारीपासून केली जाईल.
पंतप्रधानांनी म्हटले की, हेल्थ केयर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सने देशाला सुरक्षित ठेवले आहे.
त्यांना 10 जानेवारी 2022 पासून Precaution Dose दिला जाईल.

 

 

Web Title :- PM Narendra Modi | vaccine children age 15 18 yrs cost process pm modi third dose corona precaution vaccine booster dose

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1648 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

RIL Jio Happy New Year Offer | Jio नं नववर्षानिमित्त आणली भन्नाट ऑफर, जाणून घ्या काय मिळणार ‘या’ पॅकमध्ये?

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता

Total
0
Shares
Related Posts
Parvati Assembly Election 2024 | In the presence of Ashwini Kadam, Parvati Assembly Maviya ward-wise review meeting; "This election should be fought according to the problems in the constituency" is the tone of office bearers and activists

Parvati Assembly Election 2024 | अश्विनी कदम यांच्या उपस्थितीत पर्वती विधानसभा मविआ प्रभागनिहाय आढावा बैठक; ” मतदारसंघातील समस्यांना अनुसरून ही निवडणूक लढली जावी” पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर