‘कृषी कायद्यांबद्दल काहीजण संभ्रम निर्माण करताहेत’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हरियाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, काहीजण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरत आहेत या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यात याविषयी भाष्य केलं.

आधी सरकारचा निर्णय पसंत न पडल्यास विरोध व्हायचा पण आता अफवा, संभ्रम तयार केला जातो. भविष्यात त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशी भीती निर्माण केली जाते. कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. गैरसमज निर्माण केले जात आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांचा छळ केला ते आता शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. व्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय मिळतील सरकार कायदे तयार करतात काही प्रश्न स्वाभाविक आहेत तो लोकशाहीचा भाग आहे पण गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेड पाहायला मिळतो आहे, असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, आतापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केलं त्यांच्याकडूनचअफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. सरकारने केलेल्या कृषी सुधारणा ऐतिहासिक आहेत; मात्र त्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. या आधी पिकांसाठी हमीभाव असूनही खरेदी कमी व्हायची. शेतकऱ्यांच्या नावाखाली कर्जमाफी व्हायची पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची नाही. नव्या कृषी कायद्यात जुन्या पद्धतीला रोखणारी कोणतीही तरतूद नाही. आधी बाजाराबाहेर होणारा व्यवहार कायदेशीर होता अशा परिस्थितीत छोटे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. आता लहान शेतकरीसुद्धा बाजार बाहेर झालेल्या व्यवहाराविरोधात कायदेशीर पावले उचलू शकतो. शेतकऱ्यांना आता नवे पर्याय खुले झाले असून त्यांना फसवणुकीपासून कायद्याचं संरक्षण मिळालं आहे, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

You might also like