PM Narendra Modi Visit Dehu | दौरा PM मोदींचा अन् चर्चा अजित पवारांची, विमानतळावरील ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Narendra Modi Visit Dehu | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचे पुणे विमानतळावर (Pune International Airport) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी स्वागत केले. अजित पवार यांच्याकडून स्वागत स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात अजित पवारांच्या हाती असाच राहिला तर राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

 

श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर (Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj Shila Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी एकच्या सुमारास लोहगाव विमानतळावर (Lohegaon Airport)) आगमन झाले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

 

त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या स्वागताचा स्वीकार करताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचे छायाचित्र समाजमाध्यमातून (Social Media) वेगाने व्हायरल झाले. (PM Narendra Modi Visit Dehu)

 

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2019) निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी पहाटेचा शपथविधीचा कार्यक्रम झाला होता.
मात्र, यांचे सरकार केवळ 80 तास टिकले होते.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची साथ द्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनीही बोलून दाखवली होती.
या दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते.
पंतप्रधान मोदी यांचा हात अजित पवार यांच्या खांद्यावर असाच राहिला तर राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

 

 

Web Title :- PM Narendra Modi Visit Dehu | PM Narendra Modi Visit Dehu Mandir Ajit Pawar Photo Viral On Social Media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा