PM मोदींचे भव्य स्वागत पाहून PAK मंत्र्याचा ‘जळफळाट’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत. गुरुवारी ज्यावेळी पंतप्रधान पॅरिसच्या एअरपोर्टवरती पोहचले त्या वेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोदींच्या स्वागतासाठी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री स्वतः उपस्थित होते. तसेच मोदींना पाहण्यासाठी या वेळी असंख्य भारतीयांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

मात्र पाकिस्तानला हे स्वागत काही रुचलं नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसैन यांनी या बाबतचे एक ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी ज्यावेळी एअरपोर्टवर पोहचले त्यावेळचा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करण्यात आला होता. या ट्विटला रिट्विट करत फवाद हुसैन म्हणतात की या सगळ्या नाटकासाठी नेमका किती खर्च आला ?

नेटकाऱ्यांनी मात्र फवाद हुसैन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींबाबत तुम्हाला बोलायचा हक्क नाही अशा प्रकारचे ट्विट करत एकाने मंत्री खान यांची खिल्ली उडवली आहे.

 

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात आहे अशात त्यांच्या मंत्र्यांनी मोदींवर केलेल्या पैशांच्या विधानामुळे नेटकऱ्यांनी ट्विट वरती चांगलाच हिशोब चुकता केला आहे.

हे तेच मंत्री आहेत जे चीनच्या दौऱ्यावर असताना हॉटेल स्टाफ सोबत मिटिंग केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि पाकिस्तानकडूनही याचा मोठ्या प्रमाणावर समाचार घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मंत्री कुरैशी नेटकऱ्यांचा शिकार झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like