… म्हणून PM नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल हा दिवस निवडला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले असून भारतात कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे आपल्या दरवाजात किंवा गॅलरीत दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी ५ एप्रिल हा दिवस निवडला असून त्यामागे काहीतरी विशेष कारण आहे.

या १४ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ५ एप्रिलच का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या दिवसाचे ऐतिहासिक महत्व असून हा दिवस अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. या जाणून घेऊ काय विशेष महत्व आहे या दिवसाचे…

या दिवशी महात्मा गांधीजी यांच्या दांडी यात्रेचा मिठाचा सत्याग्रह झाला होता. या यात्रेचे विशेष महत्व असून राजकारणातील अहिंसक आंदोलनाचा महत्वपूर्ण प्रयोग होता. तर दुसरी घटना म्हणजे बाबू जगजीवन राम यांचा जन्म ५ एप्रिल १९०८ ला झाला होता. त्यांनी संसदेत ५० वर्षे राहण्याचा विश्वविक्रम केला असून ते १९३६ ते १९८६ साली संसदेत होते. तसेच त्यांनी वंचितांसाठी प्रयत्न केले असून तिसरी महत्वाची घटना म्हणजे या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. १९१९ साली भारतात मर्चंट शिपिंगची सुरुवात झाली असताना इंग्रजांनी आपल्या सागरी तटांवर त्यांचा कब्जा केला होता. त्याच दरम्यान मुंबईला बॉम्बे नाव मिळाले. तसेच १९७९ साली देशात पहिले नौदल संग्रहालय उभारले गेले होते.

मोदींनी काय आवाहन केले –

२२ मार्चच्या कर्फ्यूनंतर आता ५ एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे आहे. त्याला प्रकाशाच्या शक्तीचा परिचय करून देण्यासाठी सर्वानी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावायचे आहेत. सर्वांनी घरातील लाईट्स बंद करून गॅलरी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावायची आहे. यावरून हे सिद्ध होईल की, कोरोनाच्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत. तसेच सोशल डिस्टसिंग पाळावे आणि कोणीही रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, असेही मोदींनी सांगितले.