‘प्रभावी’ अच्छे दिन आणण्यासाठी मोदी सरकार ‘हे’ निर्णय घेणार ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश सध्या आर्थिक संकटातून जात असून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात ढासळत असून भारतावर मंदीचे सावट घोंगावत आहे. यासाठी सरकार मोठे निर्णय घेणार असून यामध्ये काही धक्कादायक निर्णय देखील घेतले जाऊ शकतात.

भारतात वाहन उद्योग क्षेत्रात मोठी मंदी आली असून यामधून देशाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान मोदी सरकारपुढे आहे. मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली असून यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड तरुणांवर कोसळली आहे. यावर मार्ग काढण्यासाठीच केंद्र सरकार हे दोन मोठे निर्णय घेणार आहे. यासाठी सरकार केंद्रीय करांमध्ये सवलत किंवा आर्थिक पॅकेज देऊन या उद्योगांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र सरकार यावरच थांबणार नसून ठोस पाऊल देखील उचलणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून पावले उचलण्याचे काम सुरु झाले असून भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर असे शांत बसून चालणार नसून यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पावले उचलली जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून ते स्वतः देशभरातील उद्यापगपतींशी संवाद साधणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्याचबरोबर सरकारी खर्चाच्या कपातीसारखा धाडसी निर्णय देखील ते घेऊ शकतात. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कपात करण्यात येणार असून योजनांमध्ये कुठलीही कपात करण्यात येणार नाही. त्यामुळे आता मोदी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मोदी सरकारचे संभाव्य निर्णय

१) सरकारी खर्चात कपात
२) उद्योगांना पॅकेज उपलब्ध करून देणे
३) सर्वसामान्यांना करात सवलत देणे
४) उद्योगपती तसेच गुंतवणूकदारांशी संवाद साधने

आरोग्यविषयक वृत्त-

Loading...
You might also like