Pune : PM नरेंद्र मोदींचा 28 नोव्हेंबरचा पुणे दौरा असेल ‘असा’, विभागीय आयुक्तांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  येत्या शनिवारी म्हणजेच २८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत तसेच कोरोना लसीची प्रक्रिया जाणून घेणार आहे. सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीच्या निर्मितीचे काम चालू आहे. तिसऱ्या टप्प्यात असलेल्या लसीकडे भारतसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व कामकाजाचा आढावा नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रशासन कामाला लागले आहे. पंतप्रधानांचा दौरा कसा असेल याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून देण्यात आली आहे.

काय म्हणाले विभागीय आयुक्त सौरभ राव

१. येत्या २८ नोव्हेंबरला पंतप्रधान हडपसरमधील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

२. २८ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजता नरेंद्र मोदी विमानतळावर पोहोचतील तेथून ते हेलिकॉप्टरने सिरम इन्स्टिट्यूटला जातील.

३. १ तास ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत त्यामध्ये ते कोरोना लसीची माहिती घेणार आहेत.

४. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी टीम बोलावण्यात आली आहे.

५. कोरोनाबाबत काळजी घेऊन हा दौरा करण्यात येणार आहे. अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

६. पुण्यातील कार्यक्रम पार पडला कि ते हैद्राबादला रवाना होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत १०० देशाचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. मात्र राजदूत ४ डिसेंबरला पुण्यात येणार असून ते सिरम इन्स्टिट्यूट आणि जिनिव्हा बायोफार्मासिटिकल या संस्थांना भेट देणार आहेत. त्याची सुद्धा तयारी प्रशासनकडून करण्यात येत आहे.