नरेंद्र मोदींनी पाक ‘एअर स्पेस ‘केला ‘रिजेक्ट’, ‘या’ मार्गाने जाणार किर्गिस्तानला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे १३ आणि १४ जुनला होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. या संमेलनाला जात असताना नरेंद्र मोदी यांच विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करणार नाही.

त्यांचे विमान ओमान, इराण मध्ये आशिया या मार्गावरून जाणार आहे.या आधी अशी माहिती देण्यात येत होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून जाण्यासाठी पाकिस्तानकडे भारताने परवानगी मागितली होती आणि पाकिस्तानाने देखील परवानगी दिली होती. परंतु आता परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे की, पंतप्रधानांचे विमान ओमान, इराण, मध्य आशिया या मार्गावरून जाईल.

पाकिस्तानने दिली होती परवानगी

या आधी पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इम्रान खान सरकारने नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून जाऊ देण्यास परवानगी दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय भारताला कळवण्यात येणार होता. पाकिस्तानच्या नागरी विमान प्राधिकरणाला देखील सूचना देण्यात आल्या होत्या. पाकिस्तानला आशा आहे कि भारत शांती वार्ता करण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावाचा स्वीकार करेल.

एअर स्ट्राईक झाल्यानंतर करण्यात आली आहे बंदी

भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तनाकडून त्यांच्या हवाई क्षेत्रातुन जाण्यास भारतीय विमानांना बंदी घालण्यात आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून भारतीय विमानांनी प्रवास केलेला नाही.

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात चर्चा होणार नाही

किर्गिस्तानमधील बिष्केकमध्ये येत्या १३ आणि १४ जून रोजी शांघाय सहकार्य संघटनेची (एसईओ) शिखर परिषद होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानदेखील परिषदेला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे दोन देशांच्या सर्वोच्च स्थानावरील नेत्यांमध्ये द्वीपक्षीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशा कोणत्याही चर्चेचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like