पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदेश, मंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम बंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाची पद्धती स्पष्ट करत सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. यात सर्वात महत्वाची सूचना म्हणजे सगळ्या मंत्र्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर या दीड महिन्याच्या अधिवेशन काळात कोणत्याही मंत्र्याने परदेश दौरा करू नये अशादेखील सूचना सर्व मंत्र्यांना काल या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सर्व मंत्र्यांनी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचून कामकाजाला सुरुवात करावी. कुणीही घरातून काम करू नये.

narendra-modi

केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या काल पार पडलेल्या या बैठकीत मोदींनी आपल्या नवनिर्वाचित मंत्र्यांना मार्गदर्शन देखील केले. त्याचबरोबर या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुस्लीम महिलांसाठी तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यासह इतर अध्यादेशांवरही चर्चा झाली. कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासंबंधी आणखी पुढे मोदी म्हणाले कि, वेळ काढून अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती घ्यावी. तसंच ऑफिसचं काम ऑफिसमध्येच करा, घरातून काम करणं टाळा.यासाठी मोदींनी स्वतःचे उदाहरण देत मंत्र्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या.

“गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी अधिकाऱ्यांसोबत वेळेतच ऑफिसमध्ये पोहोचायचो.”असे मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, पक्षाचे कार्यकर्ते भेटीसाठी वेळ मागत असतील तर त्यांना देखील वेळ देण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या. त्याचबरोबर राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याचा कारभार देऊन त्यांच्याबरोबर समन्वय राखण्याच्या सूचना देखील मोदींनी दिल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

*मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात