PM नरेंद्र मोदी यांचे जवळचे बालमित्र हरिकृष्ण शहा यांचं पुण्यात अपघाती निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालमित्र हरिकृष्ण घनश्यामदास शहा (64) यांचे पुण्यात शनिवारी संध्याकाळी अपघाती निधन झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हरिकृष्ण हे त्यांच्या मावस भाऊ संजय मेहता यांचे वडिल सुरेश मेहता (82) यांना भेटण्यासाठी गोखले नगर परिसरातील तपोवन सोसायटी मध्ये गेले होते. तेथे नातेवाईकांना भेटल्यानंतर 8 व्या मजल्यावरील गॅलरीमध्ये असताना ते पडले आणि ते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. ते पुण्यातील सॅलीसबरी पार्क मध्ये राहावयास होते. ते मूळचे गुजरातचे आहेत. ते पंतप्रधान मोदींचे बालमित्र असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

You might also like