‘या’ तारखे पासुन PM नरेंद्र मोदी करणार ‘मन की बात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील जनतेसाठी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर सुरू केलेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम पुन्हा सुरु होणार आहे. मार्च आणि एप्रिल हे दोन महिने ‘मन की बात’ कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मोदी यांचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला ‘मन की बात’ हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इन्स्टाग्रामवरून दिली आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी ‘नमो अ‍ॅप’वर आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.

‘मन की बात’ बद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की , ‘३० जून रोजी सकाळी ११ वाजता आपण पुन्हा एकदा भेटूयात. रेडिओला धन्यवाद. १३० कोटी भारतीयांच्या भावना आणि सामूहिक सामर्थ्याची देवाण-घेवाण करूयात. मला विश्वास आहे की, आपणाकडेही खूप साऱ्या गोष्टी शेअर करण्यासाठी असतील.’
नरेंद्र मोदी यांनी या महिन्यातील ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी सूचना पाठवण्यासाठी १८००-११-७८०० या क्रमांकावर मेसेज करण्यास सांगितले आहे. MyGov ओपन फोरमवर सुद्धा सूचना पाठवू शकता, असेही त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे. आतापर्यंत २०१४ पासून ५३ ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.

सिने जगत –

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’, बॉयफ्रेंडने केलं ‘ब्रेकअप’