महाराष्ट्र विधानसभा निकालांवर PM मोदींनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि कल आता स्पष्ट झाले आहेत. भाजपाला 100 हून अधिक जागा मिळत आहेत तर शिवसेनेला 57 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना सलाम केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला आशिर्वाद दिला आहे. आम्हाला पुन्हा एकदा पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्रासाठी आमचं काम चालुच असणार आहे. मी सर्व भाजप, शिवसेना आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हार्डवर्कला सलाम करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दरम्यान, मोदींची प्रतिक्रिया उशिरा आल्याचं आणि भाजपला म्हणाव तसं यश मिळालं नसल्याचं बोलल जात आहे.

Visit : Policenama.com