Corona चा ‘खराखुरा’ अर्थ सांगणार्‍या महाराष्ट्रीय युवकाचं PM मोदींकडून ‘कौतुक’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 फेब्रुवारी रोजीदेशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी त्यांनी ’कोरोना’ म्हणजे ’कोई रोड पे ना आये’ असा सविस्तर अर्थ सांगितला. कोरोनाची कलात्मक व संदेशरुपी फोड करणारा पठ्ठ्या हा कोल्हापूरातील आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशासमोर त्याची कलाकृती दाखवत त्याच्या कलेला प्रोत्साहन दिले आहे.

कोल्हापूरच्या विकास डिगे या कलाकाराने कोरोनाची भयंकर परिस्थिती अगदी सोप्या शब्दात दाखविणारा आणि रस्त्यावर फिरु नका असे सांगणारा ’कोई रोड पे ना आये’ आशयाचे एक रेखाकट फेसबुकवर शेअर केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या डिझाइनचा दाखला देत या कलाकाराचे कौतुक केले आणि हे डिझाइन संपूर्ण देशाला दाखवून घराबाहेर पडू नको असे आवाहन केले आहे.

मंगळवारी रात्री लॉकडाऊन जाहीर करताना केलेल्या भाषणादरम्यान नागरिकांना 21 दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्यावेळी मोदींनी भाषणादरम्यान हे डिझाइन सुद्धा आवर्जून दाखवले. आणि यामध्ये लिहिल्याप्रमाणे कोणीही रस्त्यावर येऊ नका अशी कळकळीचे आवाहन केले आहे.
कित्येक नेटकर्‍यांनी त्याचे रेखाटन लाईक करून आपापल्या वॉलवर शेअर केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा विकासचे हे कोरोना विरोधात नागरिकांना दिशा देणारे चित्र आवडल्यामुळे त्यांनी त्याचे दूरचित्रवाणीवरुन तोंडभरून कौतुक केले. तेच रेखाटन दाखवित नागरिकांनी पुढील 21 दिवस घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले. विकास याने कोल्हापूरच्या कलानिकेतनमधून कमर्शियल आर्टची पदवी घेतली असून गेली सात वर्षे तो ऍड टुमारो ॲडव्हर्टायजिंग स्टुडिओ ही जाहिरातविषयक कंपनी चालवत आहे.