PM Shram Yogi MaanDhan Yojana | PM श्रम योगी मानधन योजनेत मजूरांना मिळेल दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या कसा करावा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Shram Yogi MaanDhan Yojana | असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM Shram Yogi MaanDhan Yojana) आहे. ज्यामध्ये मजूर, वीटभट्टी, पादत्राणे बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मासिक 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल.

 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत मजुरांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मासिक 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची योजना आहे. या दरम्यान पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, पेन्शनच्या 50% रक्कम जोडीदाराला दिली जाईल.

 

या योजनेचा लाभ कसा मिळवावा –
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागेल. सरकारी आकडेवारीनुसार देशभरात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी मजूर काम करतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे आणि 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये गुंतवावे लागतील. कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन सुरू होईल.

हे लोक करू शकणार नाहीत अर्ज –
EPFO, NPS आणि ESIC चे सदस्य प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाहीत. याशिवाय करदात्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत केवळ असंघटित क्षेत्रातील कमी वेतनावर काम करणार्‍या मजुरांनाच लाभ मिळू शकतो.

 

अर्ज कसा करावा –
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी http://www.maandhan.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP सत्यापित करा.
यानंतर अर्जाचे पान उघडेल. मागितलेली माहिती नोंदवा आणि सबमिट करा.

 

Web Title :- PM Shram Yogi MaanDhan Yojana | pm shram yogi maandhan yojana laborers get 3 thousand rupees pension every month know how to apply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora Bold-Hot | शॉर्ट ड्रेस घालून मलाईका अरोरानं केलं फोटोशूट, तिच्या बोल्ड फोटोमुळं वाढला सोशल मीडियाचा पारा ! पाहा व्हायरल फोटो

 

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा किमान मूळ पगार वाढून होणार 26000! वेतन वाढवण्याबाबत आली नवी माहिती