PM Street Vendors Scheme | निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची भेट! ‘या’ लोकांना मिळणार 50,000 रु; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Street Vendors Scheme | केंद्रातील मोदी सरकारकडून विविध लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या सरकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी घेत आहेत. रस्त्यावरील कोणत्याही विक्रेत्याला पैशांची गरज असल्यास तो या योजनेअंतर्गत अर्ज करून पैसे घेऊ शकतो (PM Street Vendors Scheme). शहरी भागातील रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने २०२० मध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ‘पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी’ सुरू केला होता (Modi Govt Scheme).

 

योजना डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली
यापूर्वी ही योजना २०२२ पर्यंत होती. मात्र, आता सरकारने ती डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. होय, आता सरकारकडून ५० हजार रुपयांचे तिसरे कर्ज देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या या योजनेअंतर्गत पथारी व्यावसायिकांना किरकोळ पेपरवर्कद्वारे कर्ज दिले जात आहे. या योजनेत निश्चित मानकांच्या आधारे कर्जावर सबसिडीही दिली जाते. आता ‘पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी’ योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील. (PM Street Vendors Scheme)

 

१० हजार, २० हजार आणि ५० हजारांचे कर्ज
योजनेअंतर्गत केंद्र सरकार पहिले कर्ज १० हजार, दुसरे २० हजार आणि तिसरे ५० हजार रुपये देणार आहे. योजनेतील अर्ज मंजूर केल्यावर, अर्जदाराला कमर्शियल बँक, रुरल बँक, स्मॉल फायनान्स बँक, को ऑपरेटिव्ह बँक, एनबीएफसी इत्यादींच्या वतीने कर्जाची रक्कम दिली जाते. यामध्ये सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना एक वर्षासाठी १०,००० रुपयांचे तारणमुक्त कर्ज देते.

…तर वार्षिक ७ टक्के सबसिडी
याशिवाय रस्त्यावरील विक्रेते २०,००० आणि आता ५०,००० रुपयांचे कर्जदेखील घेऊ शकतात. यामध्ये विशेष म्हणजे कर्ज घेण्यासाठी हमी म्हणून काहीही द्यावे लागत नाही. ईएमआय (EMI) मध्ये कर्जाची परतफेड उपलब्ध आहे. तुम्ही वेळेवर पेमेंट केल्यास तुम्हाला वार्षिक ७ टक्के सबसिडीही मिळते.

 

काय आहे योजना
केंद्र सरकारने जुलै २०२० मध्ये सुरू केलेल्या पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत ३० दिवसांच्या आत कर्ज देण्याचा नियम आहे.
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

 

तुम्ही pmsvanidhi.mohua.org.in किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
याशिवाय केवायसी कागदपत्रे तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे.
योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, फळ-भाजी विक्रेते, लॉण्ड्री, सलून, पान दुकानवाले आणि फेरीवाले इ. अर्ज करू शकतात.

 

Web Title :- PM Street Vendors Scheme | pm modi govt extended pm street vendors scheme for two years how to apply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs BAN Test Series | पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

India Australia Women T20 Series | भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्वेन्टी-20 मालिका आजपासून; कोण करणार विजयी सुरुवात?

Radhakrishna Vikhe-Patil | 3 हजार 110 तलाठी पदांची भरती प्रक्रिया लवकरच – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील