PM Suraksha Bima Yojana-PMSBY | PM सुरक्षा विमा योजनेच्या नियमात बदल; प्रीमियम तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Suraksha Bima Yojana-PMSBY | अनेक कंपन्या भविष्याचा विचार करता वेगवेगळ्या विमा योजना (Insurance Plan) राबवत असतात. या अनुषंगाने अनेक लोक आपल्याला सोपे पडेल अशा योजनेत भाग घेत असतात. मात्र सरकारकडून दिली जाणारी विमा योजनाही आहेत. केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana-PMSBY) राबवत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल केले असून, त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकणार आहात. याबाबत जाणून घ्या.

 

केंद्र सरकारकडून 1 जूनपासून या योजनेच्या प्रीमियममध्ये वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये केला आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला दोन लाखांचा मृत्यू विमा (Death insurance) देते. म्हणजेच, या अंतर्गत दोन लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे, तर 1 लाख रुपये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये उपलब्ध आहेत. (PM Suraksha Bima Yojana-PMSBY)

 

सुरक्षा योजना घेण्यासाठी प्रक्रिया –

ऑनलाइन किंवा बँकेला भेट देऊन पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) फॉर्म भरू शकता.

हा विमा तुम्ही कोणत्याही बँकेतून घेऊ शकता. सार्वजनिकसह खासगी बँकांच्या वेबसाइटवरही या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खात्यातून पैसे थेट डेबिट केले जातात.

हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, मराठी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमचे बचत खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल.

प्रीमियमसाठी, तुम्हाला बँक फॉर्ममध्ये मंजूरी द्यावी लागेल की, तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल. बँका दरवर्षी 1 जून रोजी तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापून घेतील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. त्याच वेळी, जास्तीत जास्त 70 वर्षांपर्यंतचा विमा दिला जाऊ शकतो.

या सुरक्षा विमा योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात.

दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावणे किंवा एक डोळा आणि एक हात किंवा
एक पाय गमावणे यासारख्या अपघातामुळे झालेल्या कायमस्वरूपी अपंगत्वासाठी 2 लाख रुपये दिले जातील.

एका डोळ्यातील दृष्टी कमी होणे, किंवा एक हात किंवा पाय गमावणे यासारख्या अपघातामुळे कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये दिले जातील.

 

Web Title :- PM Suraksha Bima Yojana-PMSBY | 2 lakh insurance for only 20 rupees
per year know where and how to register to avail scheme PMSBY News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा