PM SVANidhi scheme | केंद्र सरकार ‘या’ लोकांना देतंय पूर्ण 10,000 रुपये, थेट खात्यात येतील पैसे; मार्चपुर्वीच तात्काळ करा ‘हे’ काम !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PM Svanidhi Scheme | केंद्र सरकारकडून देशातील सर्व घटकांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत सरकार गरीब, शेतकरी, महिला अशा सर्व घटकांना आर्थिक मदत करत आहे. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशा योजनेबाबत सांगणार आहोत ज्या अंतर्गत सरकारकडून पूर्ण 10,000 रुपये मिळू शकतात. या योजनेबाबत सविस्तर माहिती घेवूयात. (PM Svanidhi Scheme)

या योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना (PM Svanidhi Scheme) आहे, ज्या अंतर्गत सरकार स्ट्रीट व्हेंडरला 10,000 रुपयांचे कर्ज देत आहे. हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाही. याशिवाय जर कर्जाची वेळेवर परतफेड केली तर सबसिडीचा लाभही मिळतो.

कोण घेऊ शकतात योजनेचा लाभ?

या योजनेचा लाभ सलून दुकान, चप्पल दुकान, पानवडी, धोबी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, चहाचे स्टॉल, ब्रेड पकोडे किंवा अंडी विक्रेते, फेरीवाले, स्टेशनरी विक्रेते यांना योजनेचा लाभ घेता येईल.

कर्जाशी संबंधित विशेष गोष्टी-

  • सर्वप्रथम, कर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
  • हे कर्ज 24 मार्च 2020 पूर्वी किंवा त्यापूर्वी अशा कामात गुंतलेल्या लोकांनाच मिळेल.
  • या कर्जाच्या योजनेचा कालावधी फक्त मार्च 2022 पर्यंत आहे, त्यामुळे ज्यांना याची गरज आहे त्यांनी त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी.
  • स्ट्रीट व्हेंडर्स मग ते शहरी असोत की निमशहरी, ग्रामीण, त्यांना हे कर्ज मिळू शकते.
  • या कर्जाच्या व्याजावर सबसिडी उपलब्ध आहे, ती थेट कर्जदाराच्या खात्यात तिमाही आधारावर हस्तांतरित केली जाते.

गॅरंटी फ्री लोन मिळवा

या योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकते. म्हणजे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी द्यावी लागणार नाही. याशिवाय, तुम्ही मासिक हप्त्यांमध्ये कर्ज भरू शकता.

 

सबसिडी केव्हा मिळेल?

जर विक्रेत्याने पीएम स्वानिधी योजनेंतर्गत मिळालेल्या कर्जाची नियमित परतफेड केली तर त्याला वार्षिक 7 टक्के व्याज अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. व्याज अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तिमाही आधारावर पाठवली जाईल. तुम्ही कर्ज वेळेवर भरल्यास, तुमची सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईल.

अधिकृत लिंक पहा

या कर्जाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या लिंकला भेट देऊ शकता.

Web Title : PM SVANidhi scheme | pm svanidhi scheme get 10k rupees loan under this scheme pm svanidhi loan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय