PM Svanidhi Yojana | खुशखबर ! फेरीवाल्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देऊ शकतं रोख 10000 रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Svanidhi Yojana | मोदी सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM Svanidhi Yojana) अंतर्गत रस्त्यावरील विक्रेते (Street Vendors), छोटे व्यापारी आणि दुकानदारांसाठी लवकरच खुशखबर येऊ शकते. कामगार मंत्रालयाशी संबंधीत संसदेच्या स्थायी समितीने सरकारला विक्रेत्यांना कर्जाऐवजी थेट रोख पैसे देण्याचा सल्ला दिला आहे. समितीने म्हटले की, रोख पैसे दिल्याने लोकांच्या उत्पन्नाची हालचाल पुन्हा सुरू होऊ शकते. (pm svanidhi yojana parliamentary panel suggests direct cash grant for street vendors check)

समितीचे म्हणणे आहे की कोरोना महामारीचा सर्वात जास्त परिणाम मजूरांवर झाला आहे, अशावेळी त्यांना मदतीची सर्वात जास्त आवश्यकता आहे.
समिती म्हटले की, जर लॉकडाऊन सारखी स्थिती पुन्हा निर्माण झाली तर मजूरांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले जावेत.

 

23 लाख लाभार्थ्यांना मिळाला लाभ

 

संसदीय समितीने मंगळवारी लोकसभेत कोरोना महामारीच्या दरम्यान संघटित आणि असंघटित क्षेत्रांमध्ये वाढती बेरोजगारी आणि नोकर्‍या / उपजिविकेच्या नुकसानीवर एक रिपोर्ट सादर केला.

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 42.45 लाख कर्जाच्या अर्जांपैकी, 28 जून, 2021 पर्यंत केवळ 25.03 लाख अर्ज स्वीकृत करण्यात आले.
मात्र, 29 जुलैला लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले होते की, 23 लाखापेक्षा जास्त विक्रत्यांना या योजनेतून मदत करण्यात आली.
या कोरोना काळात सुमारे 2300 कोटी रुपये त्यांना दिले आहेत.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंत कोलॅटरल फ्री लोन दिले जाते.
ज्याचा वापर स्ट्रीट वेंडर्स आपले भांडवल म्हणून करतात.

 

Web Title : pm svanidhi yojana parliamentary panel suggests direct cash grant for street vendors check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! आयुष्मान भारत अंतर्गत मुलांना 5 लाखापर्यंतचा फ्री आरोग्य विमा

Sharad Pawar | शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण

Kumar Mangalam Birla | कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला वोडाफोन आयडियाच्या नॉन एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा