PM Svanidhi Yojana | मोदी सरकारचा निर्णय ! पीएम स्वानिधी योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Svanidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत असते. पीएम स्वानिधी योजना (PM Svanidhi Yojana) ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे, ज्या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात नोकरी गमावलेल्या रस्त्यावर विक्रेते, फेरीवाले आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना लाभ दिला जातो. अशा परिस्थितीत सरकार या लोकांना 10 हजार रुपयांपर्यंत कर्ज देते. आता या योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 

पीएम स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ रिलेंट फंड (PM Street Vendors Self Relent Fund) आता 8100 कोटी करण्यात आला आहे. याचा फायदा शहरी भारतातील 1.2 कोटी लोकांना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक फटका रोजंदारी कामगारांना झाला आहे. काही लोक रस्त्यावर माल विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत अशा लोकांना पुन्हा रोजगार सुरू करण्यासाठी सहाय्य केले जातेय. (PM Svanidhi Yojana)

 

या योजनेचा फायदा कसा होतो ?

या योजनेअंतर्गत कर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
शहरी असो की निमशहरी किंवा ग्रामीण असो, रस्त्यावरील विक्रेते हे कर्ज घेऊ शकतात.

या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज मिळू शकते.
म्हणजेच या योजनेत तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही.

तुम्ही कर्जाची रक्कम मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता. पीएम स्वानिधी योजनेवर सबसिडी (Subsidy) देखील उपलब्ध आहे.

कर्जदारांना हे कर्ज एका वर्षात हप्त्याने परत करावे लागेल.
जे कर्जाची वेळेवर परतफेड करतील, त्यांच्या खात्यावर वार्षिक 7 टक्के व्याज अनुदान जमा केले जाईल.

 

Web Title :- PM Svanidhi Yojana | pm svanidhi yojana scheme extended till december 2024 know its benefits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा